गुवाहाटी आणि उत्तर गुवाहाटी भागाला जोडणाऱ्या सर्वाधिक लांबीच्या रोपवे सेवेचे उद्घाटन



आसाम राज्यात ब्रम्हपुत्र नदीच्या पात्राला पार करणाऱ्या देशातल्या सर्वाधिक लांबीच्या रोपवे सेवेचे उद्घाटन करण्यात आली आहे.


:bookठळक बाबी :

• ती सेवा गुवाहाटी आणि उत्तर गुवाहाटी या दोन भागांना जोडते.तो 1.8 किलोमीटर लांबीचा मार्ग आहे.

• ती सेवा गुवाहाटीचे कचरी घाट आणि उत्तर गुवाहाटीचे डोल गोविंदा मंदिर या ठिकाणांदरम्यान कार्यरत आहे.

• रोपवे सेवेमुळे प्रवासाचा वेळ कमी होण्यासोबतच राज्यातल्या पर्यटन क्षेत्राला चालना देखील मिळणार.

ब्रह्मपुत्र नदी विषयी :

आशियातली ही एक प्रमुख नदी तिबेटमध्ये उगम पावून ईशान्य भारतातून वाहत जाऊन पुढे बांगला देशात गंगा नदीला मिळते. नदीची एकूण लांबी 2900 किलोमीटर आहे. हिमालयाच्या कैलास पर्वतश्रेणीत चेमा-युंगडुंग या हिमनदीतून ब्रह्मपुत्र उगम पावते.

ब्रह्मपुत्र नदीला तिबेटमध्ये त्सांगपो, भारताच्या अरुणाचल प्रदेशात दिहांग, आसाममध्ये ब्रह्मपुत्रा तर बांगला देशात जमुना असे म्हणतात. चिनी लोक हिला या-लू-त्सांगपू चिअँग या नावाने ओळखतात.